
आज मल्लिका शेरावत मोठ्या पडद्यावर फारशी दिसत नाही. पण एककाळ तिने गाजवलाय. मल्लिका शेरावतला ओळख मिळाली ती तिच्या बोल्डनेसमुळे. मोठ्या पडद्यावर तिने अगदी बिनधास्तपणे बोल्ड सीन्स करुन स्वत:ची वेगळी ओळख बनवली होती.

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत करिअरच्या सुरुवातीपासूनच कॉन्ट्रोवर्सी क्वीन राहिली आहे. मर्डर चित्रपट रिलीज झाल्यानंतर मल्लिका शेरावतचे पुतळे सुद्धा जाळण्यात आले होते.

रणवीर अलाहबादियाला दिलेल्या एका मुलाखतीत तिने अशाच एका वादावर मौन सोडलं. प्रश्न विचारणाऱ्यांची बोलती कशी बंद केलेली, तो किस्सा तिने सांगितलेला.

मल्लिकाने सांगितलं की, मर्डर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती डायरेक्टर महेश भट्टसोबत एका न्यूज चॅनलमध्ये गेलेली. तिथे तिला एक बकवास प्रश्न विचारण्यात आला.

न्यूज चॅनला अँकर माझ्या गाण्याचे ते खास लिरिक्स माझ्यासमोर गुणगुणत होता. त्याने जाणूनबुजून त्याच गोष्टीवर फोकस केलेलं. त्याने मला नंतर विचारलं, लाज वाटली नाही का? मी पण त्याला उत्तर दिलं, नाही वाटली लाज, मला उलट मज्जा आली.