
2004 मध्ये प्रदर्शित झालेला 'मर्डर' हा चित्रपट अनेकांना माहित असेल. या चित्रपटातील मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मी यांची जोडी खूप हिट झाली होती. या दोघांमधील इंटिमेट सीन्स चर्चेचा विषय ठरले होते.

इमरान आणि मल्लिकाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. असं असूनही नंतर या दोघांनी एकत्र काम केलंच नाही. आता तब्बल 20 वर्षांनंतर या लोकप्रिय जोडीला एकत्र पाहिलं गेलंय.

निर्माते आनंद पंडित यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये मल्लिका आणि इमरानला पाहिलं गेलं. या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला.

इमरान हाश्मीने यावेळी काळ्या रंगाचा सूट तर मल्लिका शेरावतने गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता. हे दोघं जेव्हा समोरासमोर आले, तेव्हा सर्व कॅमेरे त्यांच्याकडे फिरले. दोघांनी एकमेकांची विचारपूस केली आणि मिठीसुद्धा मारली.

त्यानंतर पापाराझींनी त्यांना एकत्र फोटोसाठी विनंती केली. तेव्हा इमरान आणि मल्लिका यांनी पापाराझींसमोर फोटोसाठी एकत्र पोझ दिले. इमरान आणि मल्लिकाचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या दोघांनी पुन्हा एकत्र काम करावं, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे.