
3 फेब्रुवारीला अभिनेत्री मानसी नाईकचा वाढदिवस पार पडला.

मानसी नुकतंच लग्न बंधनात अडकली आहे, त्यामुळे तिचा हा वाढदिवस तिच्यासाठी स्पेशल ठरला.

तिचा हा स्पेशल वाढदिवस प्रदीप खरेरानं आणखी स्पेशल केलाय.

घरातच मस्त डेकोरेशन करत प्रदीप आणि मानसीनं हा वाढदिवस साजरा केला.

या वाढदिवसाचे केक कट करताना काही फोटो मानसी आणि प्रदीपनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती प्रचंड खूश दिसतेय. लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे.