दाऊदसोबत मंदाकिनी थेट स्टेडियममध्ये, भारत-पाक… 32 वर्षांनंतर फोटो मागचे सत्य समोर
मंदाकिनीचे नाव एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत जोडले गेले होते. एका क्रिकेट सामन्यातील दोघांचे एकत्र फोटो व्हायरल झाले होते. आता याबाबत मंदाकिनीने ३२ वर्षांनंतर मोठे खुलासे केले आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनीने हिंदी सिनेमात पहिल्याच सिनेमाने खळबळ माजवली होती. चार दशकांपूर्वी ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून मंदाकिनी रातोरात स्टार बनल्या आणि त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली होती. मात्र, चित्रपटांसोबतच मंदाकिनी या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे वादात राहिल्या आहेत. एकेकाळी त्यांचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत जोडले गेले होते. भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघांदरम्यान झालेल्या एका सामन्यातील त्यांचे दाऊदसोबतची फोटो व्हायरल झाले होते. त्या फोटोवरुन तेव्हा प्रचंड चर्चा झाली होती. आता 32 वर्षांनंतर मंदाकिनी यांनी मौन सोडले आहे.
अलीकडेच मंदाकिनी यांना एका मुलाखतीमध्ये दाऊद आणि त्यांच्या एका जुन्या फोटोबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. ‘तुमच्याबाबत नेहमी एक वाद चर्चेत असतो. तुमचा दाऊदसोबतचा शारजाहमधील एक फोटो समोर आला होता. त्यात तुम्ही दाऊदसोबत बसलेल्या दिसता. त्यावर खूप खळबळ माजली होती’ असा प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावर उत्तर देत मंदाकिनी म्हणाल्या की, ‘त्याचेही काही कळत नाही. आता जे जे लोक लिहू इच्छितात, जे जे लोक बोलू इच्छितात. हे माझ्या नियंत्रणात नाही.’ त्यांना पुढे विचारण्यात आले की तुम्हाला क्रिकेटमध्ये रस आहे की तुम्ही असेच गेला होता? यावर मंदाकिनी हसल्या आणि म्हणाल्या, ‘होते असे की एका कलाकाराशी हजारो लोक भेटतात आणि आम्ही सर्वांसाठी समान आहोत.’
पुढे मंदाकिनी यांना विचारण्यात आले की तुम्हाला बोलावण्यात आले होते? तिथे खूप सारे लोक होते. यावर मंदाकिनी म्हणाल्या, ‘सर्वजण एकत्र होते, खूप सारे लोक एकत्र असतात. तर आम्ही सर्वांसाठी समान आहोत.’
मंदाकिनीला प्रश्न विचारण्यात आला, ‘तुम्ही दुबईत राहत होतात का?’ तर मंदाकिनी म्हणाल्या नाही. नंतर त्यांना विचारण्यात आले की तुम्ही फक्त सामना पाहण्यासाठी गेला होतात का? तर अभिनेत्रीने सांगितले, ‘सामना पाहण्यासाठीही गेले नव्हतो. आम्ही तर कोणत्यातरी शोसाठी गेलो होतो.’ नंतर त्यांनी सामन्यातून व्हायरल झालेल्या आपल्या आणि दाऊदच्या छायाचित्राबाबत सांगितले, ‘सामनात खूप सारे लोक बसलेले होते. कदाचित हेच कारणे असेल.’
अभिनेत्रीला पुढे विचारण्यात आले की तुम्हाला दाऊदने आमंत्रित केले नव्हते का? तर त्या म्हणाल्या, ‘नाही. हे म्हणजे एका गोष्टीला कसे वाद बनवायचे आणि कसे बाजारात आणायचे असे आहे. मला कळलेच नव्हते की अशा गोष्टी होतात.’ अभिनेत्रीने पुढे मान्य केले की दाऊदसोबतच्या त्यांच्या फोटोचा लोकांनी चुकीच्या पद्धतीने वापर केला आणि खोट्या बातम्या पसरल्या. यामुळे त्यांचे खूप नुकसान झाले.