जगातील एकमेव मूर्तीरुपी मंगळ ग्रहाचे मंदिर महाराष्ट्रात, तब्बल 27 वर्षांनी जुळून आला अनोखा योग

अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात २७ वर्षांनंतरचा मंगळ जन्मोत्सव २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात साजरा होत आहे. महाभोमयाग, नवकुंडी महाविशेष शांतीयाग, महाअभिषेक, ध्वजारोहण आणि महाआरतीसारखे विविध धार्मिक कार्यक्रम या उत्सवात समाविष्ट आहेत. लाखो भाविकांच्या सहभागासाठी आवाहन करण्यात आले आहे.

| Updated on: Aug 30, 2025 | 2:26 PM
1 / 6
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिर हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण जगात एकमेव मूर्तीरूपी मंगळ ग्रहाचे मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर अतिशय प्राचीन आणि दुर्मिळ आहे.

2 / 6
अमळनेर येथील मंगळदेव ग्रह मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून मानले जाते. या मंदिरात भाविकांची कायमच गर्दी पाहायला मिळते. सध्या अमळनेर येथील श्री मंगळ मंदिरात श्री मंगळ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

3 / 6
यावर्षी विशेष म्हणजे, मंगळवारी मंगळ जन्मोत्सव आल्याने तो थाटामाटात साजरा करण्यात आला. तब्बल २७ वर्षांनंतरचा अनोखा आणि शुभ योग जुळून आला आहे.

4 / 6
या मंगळ जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात २९ ऑगस्ट महाभोमयागाने झाली आहे. यानंतर येत्या ३१ ऑगस्ट रोजी ३६ मानकऱ्यांच्या हस्ते सपत्नीक नवकुंडी महाविशेष शांतीयाग होणार आहे.

5 / 6
तर २ सप्टेंबर रोजी पहाटे श्री मंगळ जन्मोत्सव साजरा होईल. या दिवशी श्री मंगळ महाविशेष अभिषेक, श्री पंचामृत महाभिषेक, नूतन ध्वजारोहण, ५६ भोगार्पण आणि श्री मंगळ महाआरती असे विविध धार्मिक कार्यक्रम होतील.

6 / 6
या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना मानकरी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त दिगंबर महाले यांनी भाविकांना या श्री महामंगल सुवर्णयोगाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.