Girija Oak: आता जीव घेणार का; गिरिजा ओकच्या फोटोवर नेटकऱ्याची प्रतिक्रिया

Girija Oak: गेल्या काही दिवसांपासून मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक चर्चेत आहे. नुकताच तिने शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चौथा फोटा तर घायाळ करणारा आहे.

| Updated on: Dec 26, 2025 | 2:19 PM
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक ही नॅशनल क्रश ठरली आहे. एका मुलाखतीमध्ये तिने आकाशी रंगाची कॉटनची साडी नेसून त्यावर ज्वेलरी घालून सिंपल लूकमध्ये हजेरी लावली. या लूकने गिरिजा ओकने चाहत्यांची मने जिंकली. तेव्हापासून गिरिजा चांगलीच चर्चेत आहे.

2 / 5
गिरिजा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. चाहते तिच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. गिरिजाने नुकताच नव्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती लिंबू रंगाच्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

3 / 5
फोटोंमध्ये गिरिजाने लिंबू रंगाची कॉटनची साडी परिधान केली आहे. त्यावर हातात सिंपल अशा बांगड्या घातल्या आहेत. कुरळे मोकळे केस, सिंपल मेकअपमध्ये गिरिजाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

4 / 5
गिरिजाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एका यूजरने कमेंट करत गिरिजाची तुलना अभिनेत्री साधना यांच्याशी केली आहे. तुला पाहून दिवंगत अभिनेत्री साधनाची आठवण येते अशी एका यूजरने कमेंट केली आहे.

5 / 5
दुसऱ्या एका यूजरने एका क्षणात जीव गुंतला अशी कमेंट केली आहे. तर तिसऱ्या एका यूजरने तू आमचे हृदय चोरले आहेस, आता जीव घेणार का अशी कमेंट केली आहे. सोबतच गुलाबांच्या फुलांचे इमोजी वापरले आहेत.