
अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करत असतात.

मिताली आणि सिद्धार्थ या दोघांनाही प्राण्याविषयी विशेष आवड आहे. त्यांच्या घरी एक कुत्रा आहे. त्याच्यासोबतचे फोटो ते नेहमी शेअर करत असतात.

मिताली काही दिवसांपूर्वी फिरायला बाहेर गेली होती तेव्हा तिथे तिने 'डॉगी'सोबत काढलेले फोटो इन्स्ट्राग्रामला शेअर केले होते.

सिद्धार्थदेखील आपल्या घरातल्या या खास मित्रासोबतचे फोटो इन्स्टाग्रामला शेअर करताना दिसतो.

मितालीने आजही असाच एक फोटो आपल्या इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. त्याला ‘Curio'असं कॅपशन तिने दिलं आहे.