प्राजक्ता माळीने इंडस्ट्री सोडली? 15 दिवस नॉट रिचेबल! आता समोर येताच सांगितले सत्य, नेमकं काय घडलं?

Prajakta Mali: प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच चर्चेत असते. नुकताच प्राजक्ता 15 दिवस नॉट रिचेबल होती. आता तिने सोशल मीडियावरुन ती कुठे होती याबाबत माहिती दिली आहे.

| Updated on: Mar 17, 2026 | 3:42 PM
1 / 7
मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वांची आवडती आणि लाडकी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी ओळखली जाते. ती कायमच आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलेली असते. पण गेल्या १५ दिवसांपासून ती पूर्णपणे सोशल मीडियावरून गायब झाली होती. तिच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती की, प्राजक्ता नेमकी कुठे गेली आहे? ती रिचेबल का नाही? तिने इंडस्ट्री तर सोडली नाही ना?

2 / 7
आता प्राजक्ता पुन्हा सक्रिय झाली आहे आणि सोशल मीडियावर परत येताच तिने एक मोठी आणि खास अपडेट शेअर केली आहे. तिने स्पष्ट केले की, ती फिल्म इंडस्ट्री अजिबात सोडणार नाही आणि अभिनय क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच काम करत राहणार आहे.

3 / 7
प्राजक्ता माळी गेल्या 15 दिवसांपासून बंगळुरू येथील श्री श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिविंग आश्रमात एका विशेष कोर्ससाठी होती. या काळात तिने फोन वापरला नाही आणि बाहेरचे अन्नही घेतले नाही. तिने आर्ट ऑफ लिविंग च्या Happiness Programme ची शिक्षिका (Teacher) होण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले.

4 / 7
इंस्टाग्राम पोस्टमध्ये प्राजक्ताने लिहिले आहे, "मी आर्ट ऑफ लिविंगच्या Happiness Programmeची शिक्षिका झाले आहे. १५ दिवसांचे तीव्र शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रशिक्षण पूर्ण केले. या काळात फोन वापरता आला नाही आणि बाहेरचे अन्नही खाल्ले नाही. दररोज पद्मसाधना केली (ज्यांना माहिती आहे त्यांना समजेल) आणि अजून बरेच काही अनुभवले जे शब्दांत सांगणे कठीण आहे. हो, मी लवकरच शिकवायला सुरुवात करणार आहे. Stay tuned!"

5 / 7
पोस्टच्या शेवटी प्राजक्ताने स्पष्ट नोट लिहिली आहे, "मी अजिबात फिल्म इंडस्ट्री सोडून कुठेही जाणार नाही. गेल्या ८ वर्षांप्रमाणेच अभिनय आणि या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखणार आहे."

6 / 7
प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमात होस्ट म्हणून दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिची देवखेळ ही वेब सीरिज रिलीज झाली आहे. येत्या काळात तिचे अनेक सिनेमे आणि प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत.

7 / 7
प्राजक्ता आता अभिनयासोबतच आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून हॅपिनेस प्रोग्राम शिकवण्याची जबाबदारीही पार पाडणार आहे. तिच्या या नव्या भूमिकेबद्दल चाहत्यांकडून खूप शुभेच्छा आणि उत्साह व्यक्त होत आहे. तिच्या या निर्णयाने ती अभिनय आणि अध्यात्म यांचा सुंदर समतोल साधत आहे हे दिसून येते.

Follow Us