मराठी अभिनेत्रीने परिधान केली गुजराती बांधणीतील पटोला साडी, कोण आहे ही अभिनेत्री?

मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेच्या घरी लाडक्या बाप्पाचे उत्साहात आगमन झाले असून तिने आगमनाच्या वेळी लाल-पिवळ्या साडी परिधान केली होती. या साडीमधील तिने काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

| Updated on: Sep 17, 2026 | 2:20 PM
1 / 5
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडेच्या घरी लाडक्या गणरायाचे उत्साहात आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडेच्या घरी लाडक्या गणरायाचे उत्साहात आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले आहे.

2 / 5

बाप्पाच्या स्वागतासाठी श्रेयाने खास पारंपरिक लूक केला असून, तिच्या सुंदर अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

3 / 5

श्रेयाने लाल आणि पिवळ्या रंगाची आकर्षक इकत नक्षीकाम असलेली सिल्क साडी नेसली आहे. या साडीवर तिने हिरव्या रंगाचा स्लीवलेस ब्लाऊज परिधान केला आहे.

4 / 5

त्याच्या गळ्याभोवती आणि पाठीवर केलेले सोनेरी जरीचे भरतकाम या लूकला अधिकच खुलवत आहे. पारंपरिक दागिन्यांनी श्रेयाने आपल्या सणासुदीच्या लूकला खास टच दिला आहे.

5 / 5

नाकातील मोत्याची नथ आणि कपाळावरील लाल टिकली तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. श्रेयाच्या हातांवरील नाजूक मेहंदी आणि चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य यामुळे तिचा पारंपरिक लूक अधिकच खुलून दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us