Tejashree Pradhan: तोच माझ्या आयुष्यात… तेजश्री प्रधान कोणाविषयी बोलली? वाचा

Tejashree Pradhan: जान्हवी, शुभ्रा आणि आता स्वानंदीसारख्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

| Updated on: Sep 21, 2026 | 7:56 AM
1 / 5
मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही कायमच चर्चेत असते. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या तेजश्रीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तेजश्री कायम तिच्या स्पष्ट आणि मनमोकळ्या स्वभावामुळे देखील ओळखली जाते. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही कायमच चर्चेत असते. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या तेजश्रीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तेजश्री कायम तिच्या स्पष्ट आणि मनमोकळ्या स्वभावामुळे देखील ओळखली जाते. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

2 / 5

‘सिने तडका’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तेजश्री म्हणाली की, “गेल्या काही वर्षांत मला खूप छान माणसं मिळाली. काही माणसं थोड्या काळासाठी आली आणि निघून गेली. पण आज माझ्या आयुष्यात अशी काही माणसं आहेत जी मला कुटुंबासारखी वाटतात. मनोरंजनविश्वात फक्त दोन-तीन लोक माझे खरे मित्र आहेत. बाकी सगळे मित्र इंडस्ट्रीबाहेरचे आहेत.”

3 / 5

पुढे ती म्हणाली, “इंडस्ट्रीत काम करताना मला कधीही लॉबीचा अनुभव आला नाही. कधीही त्रास झाला नाही. म्हणजे माझी कुठलीही विशिष्ट शाखा किंवा गट नाही. देवाच्या कृपेने मला काम मिळत गेले. जे काम मिळाले ते मी आदराने स्वीकारले. मी कधीही कोणत्याही कामाला कमी लेखले नाही. चांगले काम मिळावे यासाठी अट्टाहास केला नाही. कारण मला नेहमीच वाटते की जे माझे आहे ते माझ्याकडेच येणार. मग ते भूमिका असो किंवा ऑडिशन.”

4 / 5

“जेव्हा एखाद्या भूमिकेसाठी विचारणा होते, ऑडिशन देते किंवा फोनवर चर्चा होते, पण नंतर ती भूमिका दुसऱ्याला दिली जाते. अशा वेळी ते त्या व्यक्तीचे नशीब समजून सोडून द्यायचे. जे आयुष्यात मिळाले नाही त्याचे दुःख करून काय फायदा? त्यामुळे मला कधीही काही गमावण्याची भीती वाटली नाही” असे तेजश्री म्हणाली.

5 / 5

शेवटी ती म्हणाली, “त्याहीपुढे जाऊन मी देवाचे आभार मानते. कारण जेव्हा जेव्हा मला कामाची गरज होती, तेव्हा मला काम मिळाले. तोच माझ्या आयुष्यात ते आणतो आणि मी कुठलाही प्रश्न न विचारता त्याने दिलेले स्वीकारते. जेव्हा एखादी गोष्ट समोरून येते, तेव्हा तिचे आभार मानायला हवेत.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us