49 वर्षे जुन्या ट्रेनने 430 किमीचे अंतर केले 5.5 तासात पार! वंदे भारतलाही मागे टाकले; कोणती आहे ट्रेन?
Indian Railway Fastest train: ४९ वर्षे जुन्या या ट्रेनने वेगाच्या बाबतीत वंदे भारत एक्सप्रेसलाही मागे टाकून एक नवा विक्रम नोंदवला आहे.

vaigai express vs vande bharat
- जर आता तुम्हाला विचारले की भारतातील सर्वात वेगाने धावणारी ट्रेन कोणती? तर तुमच्या डोक्यात लगेच नाव येईल ते ‘वंदे भारत’चे! काहींच्या डोक्यात ‘राजधानी’ किंवा ‘शताब्दी’ या ट्रेनही येऊ शकते. पण एका ट्रेनबद्दल तुम्ही जाणून घ्या घेणे महत्त्वाचं आहे कारण तिच्या जी वेगाने ‘वंदे भारत’लाही मागे टाकते आहे.
- माहितीनुसार, ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ही १८० किमी/तास इतक्या कमाल वेगासह भारतातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. मात्र, सध्या ती ९० ते १०० किमी/तास वेगाने धावते. पण वंदे भारताला टक्कर द्यायाला वेगाच्या बाबतीत, ४९ वर्षे जुन्या ‘वैगाई एक्सप्रेस’ने वंदे भारतलाही मागे टाकले आहे.
- २४ ऑक्टोबर रोजी, चेन्नई आणि मदुराई दरम्यान धावणाऱ्या या ४९ वर्षे जुन्या ट्रेनने, अवघ्या ४ वर्षे जुन्या ‘वंदे भारत’ला वेगाच्या बाबतीत मागे टाकले. १५ ऑगस्ट १९७७ पासून रुळांवर धावणारी ‘वैगाई सुपरफास्ट एक्सप्रेस’ वेगाच्या बाबतीत ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या पुढे निघून गेली आहे.
- २४ ऑक्टोबर रोजी, वैगाई सुपरफास्ट एक्सप्रेस ही चेन्नई एग्मोर स्थानकावरून १० मिनिटे उशिरा निघाली. त्यानंतर, रुळांच्या देखभालीच्या कामामुळे तिला कोडमबक्कम येथे २० मिनिटे थांबावे लागले. या विलंबानंतरही, गाडीने ४३० किमीचे अंतर अवघ्या ५ तास ३५ मिनिटांत पूर्ण केले. ही वेळ या ट्रेनच्या नेहमीच्या ७ तास ३५ मिनिटांच्या प्रवासाच्या वेळेपेक्षा २ तास कमी होते. सामान्यतः ६६ ते ६८ किमी/तास इतका वेग राखणारी ही गाडी २४ ऑक्टोबर रोजी एक नवा विक्रम प्रस्थापित करून गेली.
- विलंब झाल्यानंतरही, वैगाई एक्सप्रेसने ताशी ११० किमी वेगाने आपला प्रवास पूर्ण केला. अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही; यापूर्वी ३ मार्च २०२२ रोजी, वैगाई एक्सप्रेस २१ मिनिटे उशिरा धावत असूनही, निर्धारित वेळेच्या आधीच आपल्या ठरलेल्या स्थानी पोहोचली होती.
Follow Us





