
महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 17 जणांचे प्राण केले आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर उपचार सुरु आहे.

मात्र आताही परिसरात सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. जनतेला जिथे आहे तिथेच राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. मात्र गर्दी सतत गंगेकडे सरकत असल्याने प्रशासनही हतबल झालं आहे.

अनेक ऋषी-मुनींनीही भाविकांना आपापल्या ठिकाणी राहण्याचे आणि कुठेही न जाण्याचे आवाहन केलं आहे. लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे. पण लोकं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सर्वत्र पळत आहेत.

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री योगी यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाल्याचे कळत आहेत. ज्यांच्यावर सेक्टर 2 मध्ये बांधण्यात आलेल्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.