Mayuri Deshmukh: मी चर्चेत रहावं म्हणून… मयूरी देशमुखचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाली? वाचा
Mayuri Deshmukh: मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मयूरी देशमुख ओळखली जाते. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मयूरीने मोठा खुलासा केला आहे.

मराठी अभिनेत्री मयूरी देशमुख ही खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली आहे. पतीच्या निधनानंतर तिला मोठा धक्का बसला होता. आता मयूरी तिच्या खासगी आयुष्याविषयी बोलताना दिसत आहे. नुकताच एका मुलाखतीमध्ये मयूरीने मोठा खुलासा केला आहे.
मयूरी देशमुखने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले की, लोकप्रियता टिकवणे हा माझा कल नव्हता. कारण मी याबाबतील प्रचंड प्रामाणिक आहे. मी काम चांगलं केलं तर मी लोकांना पसंत पडेल. मी चर्चेत रहावं म्हणून काही करणं तो माझा पिंड नाहीये. त्यामुळे मला ते बऱ्याच वेळा सोशल मीडियावाले किंवा पीआरवाले म्हणतात काय... जात जा जरा पार्टीला. रहा चर्चेत. माझं वेगळं मत आहे. त्याच्यामुळे तो ट्रॅक जरा स्लो असेल.
माझं म्हणणं आहे की कामातूनच लोकप्रियता मिळाली पाहिजे आणि त्यामुळे माझाला कल टिकवणं लोकप्रियतेपेक्षा जास्त आपलं काम... एकंतर चांगलं काम मिळवणं हा अट्टाहास. जे काम मिळवलं त्याच्यामध्ये आधीच्या कामापेक्षा चांगलं काम करणं असे देखील मयूरी म्हणाली.
ती पुढे म्हणाली की, मी आर्टिस्ट म्हणून ग्रो होणं हा माझा नेहमी सेंटर पॉइंट होता. मग त्याच्या अराऊंड हे सगळं येतं. लोकप्रियता त्याच्याने येते. मला अगदी वाटतं की मी लोकप्रियता टिकवावी म्हणून असे विशेष प्रयत्न नाही केले. बेसिक गोष्टी केल्या आहेत. म्हणजे सोशल मीडिया अकाऊंट. कारण ते आता मँडेटरी झालं आहे. तुम्हाला तुमच्या फॅनशी संवाद साधावा लागतो. नाही तर मी खूप खासगी माणूस आहे. मी आवडनी कधीच इन्स्टाग्रामवर नसते.
मयूरी 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. तिची या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. आता तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे.