जगातील सर्वात सुंदर आणि श्रीमंत महिला, ज्यांची संपत्ती छोट्या देशाच्या अर्थव्यवस्थेला देते टक्कर, 4 नंबरवर भारतीय अभिनेत्री

जगातील सर्वात सुंदर आणि श्रीमंत महिला. ज्यांची संपत्ती एखाद्या छोट्या देशाच्या अर्थव्यवस्थेला देऊ शकते टक्कर. चौथ्या नंबरवर आहे बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव.

| Updated on: Mar 20, 2026 | 3:05 PM
1 / 6
हॉलीवूडपासून ते बॉलिवूडपर्यंतच्या अभिनेत्री त्यांच्या सौंदर्याने आणि स्टाईलने चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. मात्र, या ग्लॅमरच्या दुनियेतील अनेक अभिनेत्री केवळ अभिनयापुरत्याच मर्यादित नसून त्यांनी आपल्या हुशारी, ब्रँडिंग आणि व्यवसायिक दृष्टिकोनाच्या जोरावर प्रचंड संपत्ती उभी केली आहे.

हॉलीवूडपासून ते बॉलिवूडपर्यंतच्या अभिनेत्री त्यांच्या सौंदर्याने आणि स्टाईलने चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. मात्र, या ग्लॅमरच्या दुनियेतील अनेक अभिनेत्री केवळ अभिनयापुरत्याच मर्यादित नसून त्यांनी आपल्या हुशारी, ब्रँडिंग आणि व्यवसायिक दृष्टिकोनाच्या जोरावर प्रचंड संपत्ती उभी केली आहे.

2 / 6

त्यांच्या कमाईचे आकडे इतके मोठे आहेत की ते एखाद्या छोट्या देशाच्या अर्थव्यवस्थेलाही टक्कर देऊ शकतात. विशेष म्हणजे, जगातील सर्वाधिक श्रीमंत आणि प्रभावशाली अभिनेत्रींच्या यादीत बॉलिवूडमधीलही एका अभिनेत्रीने स्थान मिळवले आहे.

3 / 6

या यादीत पहिल्या क्रमांकावर जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली गायिका आणि अभिनेत्री रिहानाचे नाव आहे. ती जगातील सर्वात श्रीमंत महिला कलाकारांपैकी एक बनली आहे. तिची एकूण संपत्ती सुमारे 1.4 बिलियन डॉलर्स (सुमारे 11,620 कोटी रुपये) इतकी आहे.

4 / 6

दुसऱ्या क्रमांकावर 90 च्या दशकात हॉलीवूडमध्ये मोठे नाव कमावलेली अभिनेत्री ॲंजेलिना जोली आहे. उत्कृष्ट अभिनयासोबतच ती एक यशस्वी दिग्दर्शकही आहे. ॲंजेलिनाची एकूण संपत्ती सुमारे 120 मिलियन डॉलर्स (996 कोटी रुपये) आहे.

5 / 6

तिसऱ्या स्थानावर हॉलीवूडमधील सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री हॅले बेरी हिचा समावेश आहे. ‘Catwoman’ या चित्रपटातून तिला मोठी ओळख मिळाली. ती एका चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी रुपयांपर्यंत मानधन घेते. तिची एकूण संपत्ती सुमारे 90 मिलियन डॉलर्स (747 कोटी रुपये) आहे.

6 / 6

या यादीत चौथ्या क्रमांकावर बॉलिवूडची ‘ग्लोबल स्टार’ म्हणून ओळखली जाणारी प्रियंका चोप्रा हिचे नाव आहे. अभिनयासोबतच प्रॉडक्शन आणि आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समुळे तिची संपत्ती सुमारे 70 मिलियन डॉलर्स (581 कोटी रुपये) इतकी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us