याला म्हणतात अजरामर गाणं, 5 दशकानंतर देखील प्रचंड सुपरहिट, पार्टीत ऐकू येताच बदलते वातावरण
बॉलिवूडमध्ये अनेक गाणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. मात्र, गेल्या पाच दशकांपासून शोले चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ऐकू येताच पार्टीचे बदलते वातावरण.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यापैकी 'शोले' या चित्रपटातील 'महबूबा महबूबा' हे गाणे विशेष गाजले. मात्र, या गाण्यामागे एक रंजक गोष्ट दडलेली आहे. हे गाणे 1973 मध्ये ग्रीक गायक मिहालिस व्हायोलारिस यांच्या 'Ta Rialia' या गाण्याच्या धुनेपासून प्रेरित असल्याचे सांगितले जाते.

या गाण्याचे संगीतकार आर. डी. बर्मन यांनी मूळ धून आधार म्हणून घेतली. मात्र, त्यात भारतीय लोकसंगीताचा प्रभाव, दमदार तालवाद्यांचा वापर आणि स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण संगीतशैलीची जोड देत त्यांनी त्याला पूर्णपणे वेगळी ओळख मिळवून दिली.

विशेष म्हणजे हे गाणे आर. डी. बर्मन यांनी स्वतः गायले असून त्यांच्या खास आवाजामुळे ते अधिकच लोकप्रिय झाले. पडद्यावर हेलेन यांच्या दमदार नृत्यामुळे आणि आकर्षक सीनमुळे 'महबूबा महबूबा' हे गाणं प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून बसले.

आजही कोणत्याही पार्टी, स्टेज शो किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात हे गाणे वाजताच वातावरण उत्साहाने भारून जाते. चित्रपटसृष्टीत परदेशी धुनांपासून प्रेरणा घेण्याची परंपरा जुनी असली, तरी प्रत्येक गाणे इतिहास घडवत नाही.

'महबूबा महबूबा'ची खासियत म्हणजे आर. डी. बर्मन यांनी केवळ धून उचलली नाही, तर भारतीय श्रोत्यांच्या आवडीनुसार तिचे संपूर्ण रूपांतर करून एक अजरामर गीत निर्माण केले. त्यामुळे जवळपास पाच दशकांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.