
मराठी अभिनेता विराजस कुलकर्णी व अभिनेत्री शिवानी रांगोळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असून नुकताच मेहंदीचा कार्यक्रम पार पडला आहे.

या मेहंदीच्या कार्यक्रमात . शिवानीच्या हातावर विराजसच्या नावाची मेहंदी रंगली असून या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

विराजस आणि शिवानी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांसोबतचे फोटो नेहमीच शेअर करतात. मात्र काही महिन्यांपूर्वीच हातातील अंगठीचा फोटो पोस्ट करत शिवानीने विराजसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं.

मेहंदीच्या सोहळ्या शिवानीने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करून त्यावर फुलांचे दागिने परिधान केले आहेत. तिच्या या लूकवर अनेकांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे

काही महिन्यांपूर्वीच विराजस आणि शिवानीने सोशल मीडियावर रिलेशनशिपची जाहीर कबुली दिली होती. मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील ही लोकप्रिय जोडी गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.