
हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लाइफ इन अ मेट्रो' या चित्रपटाचा सीक्वेल आहे. यामध्ये विविध जोडप्यांच्या विविध कथा दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटासाठी अभिनेता आदित्य रॉय कपूरला सर्वाधिक मानधन मिळाल्याचं समजतंय.

चित्रपटातील पार्थ या भूमिकेसाठी आदित्यला जवळपास 5 ते 6 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. त्यानंतर अभिनेत्री सारा अली खानला तीन कोटी रुपये फी मिळाली आहे. आदित्य आणि सारा यामध्ये प्रियकर-प्रेयसीच्या भूमिकेत आहेत. ही नवी जोडी प्रेक्षकांना खूपच आवडतेय.

या चित्रपटातील भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना 3 ते 5 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. चित्रपटात त्यांची जोडी अभिनेत्री नीना गुप्ता यांच्यासोबत आहे. त्यांना एक कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन मिळालं आहे.

या चित्रपटातील पंकज त्रिपाठी यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळतेय. त्यांची तुलना दिवंगत अभिनेता इरफान खानशी केली जातेय. पंकज यांनी चार कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे.

अभिनेत्री फातिमा सना शेखला 75 लाख ते 1 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. तर अली फजलला किती पैसे मिळाले, याची माहिती समोर आली नाही. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती.