सर्वात मोठी बातमी, छगन भुजबळ यांच्या पुन्हा अडचणी वाढणार?
मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याचं बोललं जातंय. कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांना सत्र न्यायालयानं दोषमुक्त केलंय. मात्र अंजली दमानिया यांनी त्या निकालावर आक्षेप घेत हायकोर्टात धाव घेतली होती. आता हायकोर्टानं काय म्हटलंय? हे जाणून घेऊयात.
1 / 5

मंत्री छगन भुजबळ
2 / 5

कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यात 9 सप्टेंबर 2021 ला भुजबळांना सत्र न्यायालयानं दोषमुक्त केलं. मात्र या प्रकरणात जाणून-बुजून पुरावे दडपले गेल्याचा आरोप अंजली दमानियांचा होता.
3 / 5

गेली दीड वर्ष अंजली दमानिया या निर्णयाला आव्हान देण्याच्या पाठपुरावा करत होत्या. मात्र 5 न्यायाधीशांनी 'नॉट बिफोर मी' सदर प्रकरण आमच्यासमोर नाही असं उत्तर दिल्याचं दमानियांनी म्हटलं.
4 / 5

chhagan bhujbal
5 / 5

दरम्यान याप्रकरणात पुढे काय होतं? ते ४ आठवड्यांनी समोर येईल. मात्र कधीकाळी भाजपनंच भुजबळांवर जे आरोप केले होते, त्याचप्रकरणावरुन हायकोर्टानं पुन्हा सुनावणी सुरु केलीय, आणि आत्ता भुजबळ भाजपसोबत सत्तेत असल्यानं निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांना आयता मुद्दा मिळणार आहे.
Follow Us