सर्दी लवकर बरी होण्यासाठी वाफ घेताना पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी

| Updated on: Nov 15, 2022 | 4:48 PM

1 / 5
थंडीचे दिवस सुरू झाले असून या ऋतूमध्ये बऱ्याच लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी सर्दीमुळे बंद झालेले नाक मोकळे करण्यासाठी अनेक जण गरम पाण्याची वाफ घेतात. त्या पाण्यात तुम्ही काही पदार्थ मिसळल्यास सर्दीपासून लवकर आराम मिळू शकेल.

2 / 5
ओवा - वाफ घेण्यासाठीच्या पाण्यात तुम्ही 1 ते 2 चमचे ओवा टाकू शकता. त्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी तसेच अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी, कफ यांचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल.

3 / 5
 पुदीना तेल - पुदिन्याच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. तसेच अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मही असतात. जे बंद नाक उघडण्याचे काम करतात. यासाठी वाफेच्या पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे 2 ते 3 थेंब तुम्ही घालू शकता. यामुळे तुमची सर्दी कमी होऊ शकेल.

4 / 5
 तुळशीची पाने - वाफ घेताना तुम्ही पाण्यात तुळशीची पानेही टाकू शकता. पाण्यात तुळशीची पाने घालून ते पाणी चांगले उकळून घ्या व नंतर त्याच पाण्याने वाफ घ्या.  यामुळे बंद नाक उघडते. तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ॲलर्जीक गुणधर्म असतात.

5 / 5
सैंधव मीठ - सर्दी-खोकला झालेला असताना वाफ घेत असाल तर त्या पाण्यात तुम्ही सैंधव मीठ टाकू शकता. त्याने तुम्हाला सर्दीपासून आराम मिळेल. तुम्ही गरम पाण्यात सैंधव मीठ टाकून त्या पाण्याने गुळण्याही करू शकता. त्यामुळे तुमच्या घशाला शेक बसेल व कफ सुटण्यासही मदत होईल.