Raj Thackeray | पारंपरिक सदरा-लेंग्याऐवजी टी-शर्ट, जीन्समधील राज ठाकरेंच्या हॅण्डसम लूकचे काही खास फोटोज
Raj Thackeray | सध्याच्या राजकीय परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरात एक सही संतापाची हे अभियान राबवण्यात आलं. आज शिवाजी पार्कमध्ये स्वत: राज ठाकरे सहभागी झाले होते.
1 / 5

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा असो वा पत्रकार परिषद ते नेहमीच पारंपारिक सदरा-लेंगा या पोषाखात दिसतात. अपवादाने ते वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसतात.
2 / 5

राज्यातल्या विचित्र युत्या, आघाड्यांमुळे मनसेने ‘एक सही संतापाची’ हा उपक्रम सुरु केला. त्यात थेट जनतेला सामावून घेतलं.
3 / 5

आज शिवाजी पार्क येथे राज ठाकरेंच्या निवासस्थानी ‘एक सही संतापाची’ माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थिती विरोधात संताप व्यक करण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे एक वेगळ्या लूकमध्ये दिसले.
4 / 5

एरवी सफेद रंगाच्या सदरा-लेंग्यामध्ये दिसणारे राज ठाकरे आज टी-शर्ट आणि जीन्स या वेस्टन लूकमध्ये होते. त्यांच्या डोळ्यांवर गॉगल होता.
5 / 5

राज ठाकरेंची महाराष्ट्राच्या हॅण्डसम नेत्यांमध्ये गणना होते. त्यांचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
Follow Us