Raj Thackeray : विद्यार्थी जिंकले, राज ठाकरे कामाला लागले, आधी दौरे अन् आज धडाधड घेतले महत्वाचे निर्णय

Raj Thackeray : मोदी सरकार विरोधात जेन झीं च विद्यार्थी आंदोलन यशस्वी झाल्यापासून राज ठाकरे राजकारणात सातत्याने भूमिका घेताना दिसतायत. पु्न्हा एकदा जोरदारपणे ते सक्रीय झाले आहेत.

| Updated on: Aug 10, 2026 | 1:35 PM
1 / 5
राज ठाकरे यांनी आज एक महत्वाची बैठक घेतली. मागच्या काही दिवसांपासून ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होते. नाशिकचा त्यांनी दौरा केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नीटच्या आंदोलनावरुन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशाच्या शिक्षणव्यवस्थेची जी हालत झालीय, त्यावरुन त्यांनी सरकारला चांगलचं झापलं.

2 / 5
काल ठाकरे रायगडच्या दौऱ्यावर होते. गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होत नाहीय. त्या मुद्यावरून त्यांनी अनेकदा केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे. काल त्यांनी थेट तिथूनच नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली.

3 / 5
आज राज ठाकरे यांनी मुंबईत पक्षाची एक महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले. राज ठाकरे यांनी मुंबईतील 14 विधानसभा मतदारसंघांसाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.  प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

4 / 5
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नियुक्त्या जाहीर झाल्या.  पक्ष संघटना वाढवण्यासाठी आतापासूनच तयारी करा. 2029 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा अशा राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

5 / 5
मागच्या 14 वर्षांपासून राज ठाकरे यांना राजकारणात सातत्याने अपयशाचा सामना करावा लागतोय. 2009 ची विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर 2012 च्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बऱ्यापैकी यश मिळालं. पण नंतर पक्षाची घसरण सुरुच राहिली. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा फक्त एक आमदार निवडून आला. 2024 मध्ये भोपळाही फोडता आला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us