ना राज, ना शर्मिला, ना अमित, मनसेच्या मोठ्या बैठकीत ‘या’ ठाकरेंचा बोलबाला

| Updated on: Jan 29, 2021 | 2:42 PM

Who is Mitali Thackeray : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते अमित यांची पत्नी मिताली ठाकरे यांनी.

1 / 7
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबईतील या बैठकीला मनसेचे राज्यातील बडे नेते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. राज ठाकरे हे मार्च महिन्यात अयोध्येचा दौरा करणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. आजच्या बैठकीसाठी मनसेचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राज यांचे सुपुत्र अमित यांनीही या बैठकीला हजेरी लावलीच, मात्र या बैठकीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते अमित यांची पत्नी मिताली यांनी.

2 / 7
मिताली ठाकरे पहिल्यांदाच मनसेच्या राजकीय कार्यक्रमात दिसल्या. अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे हे वांद्र्यातील MIG क्लब इथल्या बैठकीला पोहोचले. मनसेच्या बैठकीला उपस्थित राहण्याची मिताली यांची ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी त्या मनसेच्या कार्यक्रमांना दिसल्या नव्हत्या.

3 / 7
अमित आणि मिताली यांचा 27 जानेवारी 2019 रोजी विवाह झाला. नुकतंच त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण होत आहे. गेल्यावर्षी अमित ठाकरे सक्रिय राजकाणात उतरले. त्यांची मनसेच्या नेतेपदी निवड झाली. त्यानंतर आता मिताली ठाकरे या सुद्दा हळूहळू सक्रिय होताना दिसत आहेत.

4 / 7
कोण आहे मिताली ठाकरे? -   मिताली ठाकरे फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. मिताली प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांची मुलगी आहे. तसेच राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे आणि मिताली बोरुडे या चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघींनी मिळून ‘द रॉक’ हा कपड्यांचा ब्रँड त्यांनी लाँच केला होता.

5 / 7
अमित आणि मितालीची लव्ह स्टोरी -   अमित आणि मितालीची दहा वर्ष जुनी मैत्री आहे. कॉलेजमध्ये असतानाच अमित आणि मिताली एकमेकांच्या प्रेमात पडले. अमित ठाकरे पोद्दार महाविद्यालयात कॉमर्स शाखेत शिकत होते. तर मिताली रुईया महाविद्यालयात कला शाखेत शिकत होत्या. कॉलेजमध्ये असताना या दोघांची ओळख झाली आणि काही वर्षांनी या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.

6 / 7
अमतिने मितालीला प्रपोज केलं आणि मितालीनेही त्याला होकार दिला. मिताली आणि उर्वशी या दोघी मैत्रिणी असल्यामुळे कृष्णकुंजवर मितालीचे सारखं येणं जाणं सुरु होतं. मात्र काही दिवसानंतर या दोघांनी आपल्या नात्याबद्दल घरात सांगितले आणि दोघांच्या घरच्यांनीही याला होकार दिला.

7 / 7
अमित आणि मितालीची दहा वर्ष जुनी मैत्री आहे.