
बजेटची तारीख कंची? नवीन अपडेट आहे तरी काय

झी बिझनेसने सूत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, विमा क्षेत्रासाठी या बजेटमध्ये खूप काही खास असेल. सर्व विमा कंपन्या आता सर्व प्रकारच्या विमा पॉलिसी विकू शकतील. जीवन विमा विक्री करणाऱ्या कंपन्यांना जनरल आणि लाईफ इन्शुरन्स विक्री करता येईल.

बजेट काळात विमा सुधारणा कायद्याला मंजुरी मिळू शकते. तर विमा कंपनी सुरु करण्यासाठी लागणाऱ्या सुरुवातीच्या खर्चात कपात करण्यात येऊ शकते. विमा दुरुस्ती विधेयकात जोखीम आधारीत पतधोरण निश्चित होईल, त्यानुसार जोखमीनुसार नुकसान भरपाईचे गुणोत्तर ठरेल.

आगामी अर्थसंकल्पात आयकराविषयी अनेक प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकर कर सवलतीविषयी मोठा निर्णय घेऊ शकते. मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न असू शकतो.

नवीन कर प्रणाली निवडणाऱ्या व्यक्तीलाच कर सवलतीचा फायदा देण्यात येऊ शकतो. तर जुन्या कर प्रणालीत 80C कलमातंर्गत कर सवलत वाढविण्यात येऊ शकते. तर नवीन कर प्रणालीत काही बदलाची शक्यता आहे.

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या जुलैमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात नवीन कर रचनेची घोषणा करु शकतात. त्याविषयीची तयारी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवीन कर रचना करताना मध्यमवर्गाला केंद्र स्थानी ठेवण्यात आले आहे. जर सूत्रांची माहिती खरी ठरली तर हे केंद्रीय बजेट मध्यमवर्गाला लॉटरी पेक्षा कमी नसेल.