कोरा करकरीत चेक दिला तरी गायकाचा नकार; 52 वर्षं जुन्या सदाबहार गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान असं काही घडलं की…
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अजरामर गाणी आणि त्यांच्याशी जोडलेले रंजक किस्से आजही ऐकायला मिळतात. असाच एक किस्सा मोहम्मद रफी यांच्या एका (1965) चित्रपटातील गाण्याशी संबंधित आहे. या गाण्यासाठी रफी साहेबांना चक्क कोरा चेक देण्यात आला होता.

बी आर चोपडा यांनी मोहम्मद रफी यांना सांगितले की तुम्ही फक्त माझ्या चित्रपटांसाठी गाणं गायचं यावर मोहम्मद रफींनी नकार दीला होता. यावरूनच रफी आणि चित्रपट निर्माते बी. आर. चोपडा यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे रफी साहेबांनी त्यांच्या चित्रपटांसाठी गाणे बंद केले होते.
या गाण्याला संगीतकार रवी यांनी संगीत दिले होते. गीतकार साहिर लुधियानवी यांनी लिहिलेल्या या गाण्यासाठी रवी यांना रफी यांचाच आवाज हवा होता.
रफी साहेबांशिवाय हे गाणे रेकॉर्ड करणार नसल्याचे रवी यांनी स्पष्ट केले. त्यांची भूमिका ऐकल्यानंतर चोपडा यांनाही रफी यांच्या आवाजाचे महत्त्व पटले.
बी. आर. चोपडा यांनी रवी यांच्यासमोर कोरा चेक ठेवला. रफी साहेबांनी हवी ती रक्कम भरून गाणे गावे, अशी त्यांची इच्छा होती.
रफी साहेबांनी हा चेक नम्रपणे नाकारला. त्यांच्यासाठी पैशांपेक्षा नाती आणि संगीत महत्त्वाचे होते. अखेर चोपडा यांनी स्वतः संवाद साधून गैरसमज दूर केले आणि रफी साहेबांनी नेहमीच्या मानधनात हे अजरामर गाणे गायले.