3 चित्रपटांमधून झालं रिजेक्ट; 9 वर्षे वाट पाहिल्यानंतर या गाण्याने घातला धुमाकुळ, सगळीकडेच…
मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांची अनेक गाणी चाहत्यांसाठी एक खास अनुभव ठरली मात्र त्यापैकी एका गाण्याची स्टोरी काही वेगळी आहे. रफी यांनी गायलेलं एक गाणं प्रचंड हिट झालं, मात्र या गाण्याला पडद्यावर येण्यासाठी 9 वर्षे वाट पाहावी लागली. 3 चित्रपटांत संधी न मिळाल्यानंतर ‘हंसते जख्म चित्रपाट हे गाणं प्रदर्शित झालं. अन् नंतर गाण्याने कमालच केली.

हे गाणं दुसरं तिसरं कोणतं नसुन "तुम जो मिल गये हो तो ये लगता है ये जहॅं मिल गया" आहे. 1964 मध्ये मदन मोहन आणि कैफी आजमी यांनी ‘हकीकत’साठी हे गाणे तयार केले. मात्र, ते चित्रपटात समाविष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे ही रचना प्रेक्षकांपर्यंत पोहोचली नाही.
1966 मध्ये ‘आखिरी खत’साठी गाण्याचा विचार करण्यात आला. मदन मोहन परदेशात असल्याने गाणे घेता आले नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा गाणे बाजूला राहिले.
1970 मध्ये ‘हीर रांझा’साठीही गाण्याचा विचार झाला. मात्र, ग्रामीण वातावरणाशी त्याची शैली जुळत नव्हती. त्यामुळे तिसऱ्यांदा त्याला स्थान मिळाले नाही.
1973 मध्ये ‘हंसते जख्म’मध्ये हे गाणे आले. नवीन निश्चल आणि प्रिया राजवंश यांच्यावर ते चित्रित करण्यात आले. रफींच्या आवाजामुळे गाणे लोकप्रिय झाले.
कैफी आजमींचे शब्द आणि रफींचा आवाज गाण्याला वेगळी उंची देतात. 5 दशकांनंतरही हे गाणे रोमँटिक गाण्यांच्या यादीत लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता आजही कायम आहे.