या माशाची अंडी सर्वात महाग, तब्बल 30 लाख रुपयांना…नाव वाचून धक्काच बसेल!

या माशाचे नाव बेलुगा स्टर्जन असे आहे. या माशाच्या अड्यांची किंमत खूपच आहे. या अंड्यापासून अल्मास नावाचा खाद्यपदार्थ तयार केला जातो. हा खाद्यपदार्थ खूपच महाग विकला जातो.

| Updated on: Feb 17, 2026 | 7:57 PM
1 / 5
पृथ्वीवर अनेक प्रकारचे थक्क करणारे चमत्कार आहेत. काही गोष्टी तर अशा आहेत, की त्यांचे गूढ अजूनही समजू शकलेले नाही. समुद्रातील जीवन तर अधिकच रहस्यमयी आहे. सागरात वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात. असाच एक दुर्मिळ मासा आहे, ज्याची अंडी खूपच महाग आहेत.

पृथ्वीवर अनेक प्रकारचे थक्क करणारे चमत्कार आहेत. काही गोष्टी तर अशा आहेत, की त्यांचे गूढ अजूनही समजू शकलेले नाही. समुद्रातील जीवन तर अधिकच रहस्यमयी आहे. सागरात वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात. असाच एक दुर्मिळ मासा आहे, ज्याची अंडी खूपच महाग आहेत.

2 / 5

या माशाचे नाव बेलुगा स्टर्जन असे आहे. या माशाच्या अड्यांची किंमत खूपच आहे. या अंड्यापासून अल्मास नावाचा खाद्यपदार्थ तयार केला जातो. हा खाद्यपदार्थ खूपच महाग विकला जातो. आकड्यातच सांगायचे झाल्यास बेलुगा स्टर्जन या माशाचे अंडे 25 ते 30 लाख रुपये किलोने विकले जातात.

3 / 5

स्टर्जन जातीच्या माशांची अंडी खूपच महाग विकली जातात. स्टर्जन जातीमध्ये अल्बिनो बेलुगा स्टर्जन नावाच्या माशाचे अंडे सर्वाधिक माहग आहे. कारण ही प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हा मासा फारच दुर्मिळ झालेला आहे.

4 / 5

दुसरं कारण म्हणजे या जातीतील एक मासा मॅच्युरिटीपर्यंत येण्यासाठी 20 चे 100 वर्षे लागू शकतात. साधारण 20 ते 100 वर्षांपर्यंत या माशांची देखभाल करावी लागते म्हणूनच या माशांच्या अंड्यांची किंमत खूप जास्त असते.

5 / 5

माशांच्या अंड्यांपासून तयार करण्यात येणारे अल्मास केव्हियार हे हातापासून तयार केले जाते. म्हणूनही त्याची किंमत जास्त असते. कधीकधी सर्वाधिक महाग असलेले केव्हियार 24 कॅरेट गोल्ड प्लेटेड कंटेनरमध्ये पाठवले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us