OTT वर सर्वाधिक काय पाहिलं गेलं? कोणत्या मालिकांना प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती?

Top Watched Shows On OTT: ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला काहीतरी नवीन प्रेक्षकांच्या भेटीला येतं. यापैकी काही चित्रपट आणि शोज प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरतात. गेल्या आठवड्यात कोणते चित्रपट आणि सीरिज सर्वाधिक पाहिले गेले, त्याबद्दल जाणून घेऊयात..

| Updated on: Jan 14, 2026 | 10:48 AM
1 / 7
'ऑरमॅक्स मीडिया'ने 5 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत ओटीटीवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या शोज आणि चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. यावेळी क्रिकेट मॅचेसने बाजी मारली आहे. जर टॉप 10 मध्ये बऱ्यात चित्रपट आणि मालिकांनी आपलं स्थान पक्कं केलं आहे.

2 / 7
11 जानेवारी रोजी भारत आणि न्यूझीलँडदरम्यान पहिला वनडे मॅच खेळला गेला होता. या मॅचची लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर करण्यात आली होती. या मॅचला प्रेक्षकांनी सर्वाधिक पाहिलंय. तब्बल 14.2 मिलियन (1 कोटी 42 लाख) व्ह्यूज या मॅचला मिळाले आहेत.

3 / 7
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 'वीमेन प्रीमियर लीग 2026' आहे. याला जिओ हॉटस्टारवर 7.6 मिलियन (76 लाख) व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून महिलांच्या क्रिकेट सामन्यालाही प्रेक्षकांकडून सर्वाधिक पसंती मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे.

4 / 7
एकता कपूर निर्मित 'नागिन' या लोकप्रिय मालिकेचा सातवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ही मालिका या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणाऱ्या या मालिकेला 5.2 मिलियन (52 लाख) व्ह्यूज मिळाले आहेत.

5 / 7
टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या यादीत चौथ्या स्थानी आहे. सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 4.4 मिलियन (44 लाख) व्ह्यूज मिळाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय.

6 / 7
'लाफ्टर शेफ्स सिझन 3' हा कुकिंग शोसुद्धा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. जिओ हॉटस्टारवरील या शोला 4.2 मिलियन म्हणजेच 42 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. हा शो या यादीत पाचव्या क्रमाकांवर आहे.

7 / 7
यामी गौतम आणि इमरान हाश्मीच्या 'हक'ला 3.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट स्ट्रीम होतोय. तर 'अनुपमा' या मालिकेला 3.5 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. जियो हॉटस्टारवर ही मालिका स्ट्रीम होतेय.