Mouth Ulcer: थंडीतही वारंवार येतंय तोंड? मग करा हा साधा उपाय

Mouth Ulcer in Winter: आता इतका कडक हिवाळा असतानाही अनेकांचे तोंड येते. थंडीतही तोंडात फोड येत असतील तर अनेकांना हे त्रासदायक वाटतं. इतक्या थंडीतही तोंड येत असल्याने अनेक जण घाबरून जातात. पण त्यावर हा सोपा उपाय करता येऊ शकतो. त्यामुळे तोंड येणार नाही.

| Updated on: Jan 15, 2026 | 5:33 PM
1 / 7
यंदा थंडी  चांगलीच जाणवते. मध्यंतरी आभाळ आले आहे. पण या थंडीतही काहींचे तोंड आले आहे. थंडीत वारंवार तोंड येत असल्याने आपल्याला शरीराला झाले तरी काय? असा सवाल अनेकांना पडला आहे. इतक्या थंडीतही तोंड येत असल्याने अनेक जण घाबरून जातात. पण त्यावर हा सोपा उपाय केल्यास ही समस्या सुटू शकते.

2 / 7
हिवाळ्यातील कोरड्या हवेमुळे शरीरातील ओलावा कमी होतो. शरीरातील शुष्कपणा वाढतो. त्यामुळे त्वचा रूक्ष होते. त्वेचेची जळजळ होते. तर तोंडात फोड उठतो अथवा जखम होते. तोंड येते. त्यामुळे मग थंड पाणी झोंबते. तर दुसरं काही पिता येत नाही की खाता येत नाही. एकतर हिवाळा आणि त्यात तोंड येत असल्याने अनेकांची चिडचिड होते.

3 / 7
थंडीत शरीराला इतके पाणी लागत नाही. तसेच पाणी थंड असल्याने आणि तहान लागत नसल्याने अनेक जण पुरेशा प्रमाणात पाणी पित नाही. पाणी कमी झाल्याने मग शरीरात उष्णता वाढते. मग पायाची आग होणे, उत्साह कमी होणे आणि तोंड येण्यासारखे प्रकार घडतात. तोंडात जखम होते. तोंड येते आणि मग त्रास होतो.

4 / 7
पाणी कमी झाल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. पाणी कमी झाल्याने पचन क्रिया मंदावते. तर या काळात पचन क्रियेवर ताण येतो. पोट व्यवस्थित साफ होत नाही. त्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. उष्णतेचा परिणाम होऊन तोंड येते. पोट व्यवस्थित साफ झाले तर तोंड येण्याचे प्रमाण बरेच कमी होते.

5 / 7
अशावेळी उष्ण आणि मांसाहार कमी करावा. उष्णतावर्धक पदार्थ जेवणातून कमी करावे. तर दोन्ही वेळेला योग्य प्रमाणात संतुलित आहार घ्यावा. योग्य प्रमाणात, मुबलक पाणी प्यावे. पोट साफ होण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने विरेचक घेऊ शकता. त्यामुळे पोट साफ होऊन शरीरातील उष्णता कमी होईल.

6 / 7
तर तोंडातील छाल्यांसाठी, फोडांसाठी कोमट पाण्यात मीठ टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा गुळण्या करणे फायदेशीर ठरू शकते.  तोंड आलेल्या जागी मध लावल्यामुळे दाह कमी होईल. रात्री झोपताना जिभेवर आणि तोंडात तूप लावल्याने थंडावा वाढेल आणि दाह कमी होईल.

7 / 7
डिस्क्लेमर: ही विविध स्त्रोतावरून दिलेली माहिती आहे. तोंड आल्यास तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञाचे मार्गदर्शन आवश्यक घ्या.