
धोनीचे लाखो चाहते आहेत त्याच्यासाठी अनेकजण काहीतर वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. मग ते मैदानात असो किंवा मैदानाबाहे, मागे एकदा धोनीच्या पोस्टरला अभिषेक घालण्यात आला होता. अशातच एक पठ्ठ्याने धोनीला चेपॉकचं स्टेडिअमचं स्ट्रक्चर गिफ्ट केलं आहे.

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चाहता कर्णधार एमएस धोनीला खास भेट देताना दिसत आहे.

चेन्नई सुपर किंग्सने त्यांचा शेवटचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळला आणि चेपॉक स्टेडियमवर एमएस धोनीचा हा शेवटचा सामना होता. या सामन्यात चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागलं होतं त्यानंतर धोनी आणि सर्व स्टाफने चाहत्यांचे आाभार मानले होते.

धोनीने दिलेल्या गिफ्टनंतर चाहत्यांनीही एमएस धोनीला रिटर्न गिफ्ट देण्यास सुरुवात केलेली दिसत आहे. फॅनने माहीला दिलेल्या गिफ्टचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे. सीएसकेचा सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत होणार आहे.