
देशभरात शनिवारी 7 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीचा उत्साह होता. घरोघरी ढोल ताशे आणि जयघोषात गणपती बाप्पाचे आगमन झाले. मोठ-मोठ्या मंडळासह राज्यातील प्रत्येक खेडे, शहरात घरोघरी गणराय विराजमान झाले. देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या महलात पण बाप्पांचे उत्साहात आगमन झाले.

अँटिलियात भव्य आणि दागदागिन्यांनी सुशोभित केलेल्या बाप्पाचे आगमन झाले.

नवविवाहित जोडपे राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानी यांनी गणपती आगमनावर पूर्ण धार्मिक विधीसह गणराया स्थापित केला.

गणेश चतुर्थीच्या या शुभ मुहूर्तावर मुकेश अंबानी यांची आई कोकिलाबेन अंबानी आणि पत्नी नीता अंबानी बाप्पासमोर नतमस्तक झाले.

वर्षातील या खास उत्सवात अँटिलियात काही सेलिब्रिटी पण हजर झाल्या. गायक बी प्राकने अँटिलियातील गणपती पूजेत त्याचे गाणं सादर केले.

अंबानी कुटुंबातील सदस्यांसोबत अनेक पाहुण्यांनी गणतीची आरती केली. नवविवाहित जोडपे राधिका मर्चेंट, अनंत अंबानी, श्लोका अंबानी मनोभावे पूजा करताना दिसले.