Penny Stock: एकाच महिन्यात पैसा डबल! आज पुन्हा 5 टक्क्यांची भरारी, गुंतवणूकदारांची गरिबीच दूर झाली

Multibagger Penny Stock: या पेनी स्टॉकने वर्षाच्या पहिल्याच दिवशी धमाल उडवून दिली. गेल्या एका महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट केला. तर आज पहिल्याच दिवशी हा शेअर 5 टक्क्यांनी वधारला. आता या कंपनीने एक AI कंपनीचे अधिग्रहण केल्याने गुंतवणूकदारांचे तिकडे लक्ष लागेल आहे.

| Updated on: Jan 01, 2026 | 5:08 PM
1 / 6
पेनी स्टॉक  Advance Technologies कंपनीच्या शेअरने धमाल उडवून दिली. या कंपनीच्या शेअर्सला वर्षाच्या पहिल्याच दिवशी अप्पर सर्किट लागले. एका महिन्याचा विचार केला तर या गुंतवणूकदारांचा पैसा डबल झाला. आता या कंपनीने हैदराबाद येथील AI कंपनी Pushpak AI चे अधिग्रहण, खरेदी केल्याची वार्ता येऊन धडकली आहे.

2 / 6
Pushpak AI कंपनीत Advance Technologies ने पूर्ण वाटा घेतला आहे. 100 टक्के अधिग्रहण केले आहे. सध्या एआयचे बाजारात गारुड आहे. भविष्यातील नांदी ओळखत या कंपनीने हैदराबाद येथील एआय कंपनी खरेदी केली आहे. जगात 2032 पर्यंत एआयचे मार्केट 2.4 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

3 / 6
Advance Technologies चा शेअर 1.90 रुपयांवर उघडला. आज दिवसभरात कंपनीचा शेअर 5 टक्के उसळीसह 2 रुपयांच्या इंट्रा-डे उच्चांकावर पोहचला आहे. या पेनी स्टॉकचा 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी 3.15 रुपये तर कंपनीचा 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 0.52 रुपये आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 396 कोटी रुपये इतके आहे.

4 / 6
Advance Technologies चा शेअर एका महिन्यात 110 टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ज्यांनी हा शेअर धरुन ठेवला आहे. त्यांना आतापर्यंत 127 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. त्यामुळे पोझिशनल गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला आहे. या दरम्यान सेन्सेक्स इंडियात 1.80 टक्क्यांची तेजी दिसून आली.

5 / 6
या कंपनीच्या गुंतवणूकदारांना शेअर स्प्लिटचा तीनदा लाभ मिळाला आहे. पहिल्यांदा या कंपनीने 2009 मध्ये शेअर 10 भागात विभागला. दुसऱ्यांदा कंपनीने 2023 मध्ये शेअरचा विभागला. त्यावेळी कंपनीने दोन हिश्यात विभागणी केली. त्यानंतर या शेअरची फेस व्हॅल्यू 5 रुपयांहून 1 रुपया प्रति शेअरवर आली. तर 2009 मध्ये या कंपनीने 4 शेअर बोनस दिले होते.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.