
सरकारी कंपनी हिंदूस्थान कॉपरच्या शेअरमध्ये सोमवारी मोठी उसळी दिसून आली. सहा महिन्यात या स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले. या स्टॉकने दामदुप्पट परतावा दिला. यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले. नवीन वर्षात या गुंतवणूकदारांना लॉटरी लागली.

BSE वर हिंदूस्थान कॉपरचा शेअर 2.01 टक्क्यांनी वाढून 552.80 रुपयांवर बंद झाला. गेल्या सहा महिन्यांचा विचार करता या शेअरमध्ये 101.35 टक्क्यांची वाढ झाली. गेल्या एका महिन्यात स्टॉकमध्ये 48.66 टक्के तेजी दिसून आली. तर एका वर्षात हा स्टॉक 134.60 टक्क्यांनी उसळला. पाच वर्षांचा लेखाजोखा पाहिला असात या शेअरने 718.36 टक्क्यांचा रिटर्न दिला.

जागतिक बाजारात तांब्याच्या दरात वाढ झाल्यानं हिंदूस्थान कॉपरच्या स्टॉकमध्ये मजबूती दिसून येत आहे. बीएसई आणि एनएसईनं या सरकारी कंपनीच्या स्टॉकला Short Term Additional surveillance टाकलं आहे. तांब्याच्या वाढत्या किंमतींमुळे ही काळजी घेण्यात आल्याचं समोर आले आहे. नफेखोरीला आळा घालण्यासाठी हा उपाय करण्यात आला आहे.

Hindustan Copper Share आजही तेजीच्या वारुवर स्वार होता. या शेअरमध्ये आज 2.21 टक्क्यांची जोरदार उसळी दिसून आली. गेल्या पाच दिवसांत या शेअरमध्ये 7.58 टक्क्यांची वाढ झाली. हा शेअर आज एनएसईवर 564.80 रुपयांवर बंद झाला. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदार शोधत आहेत.

केवळ हिंदूस्थान कॉपरच नाही तर नाल्को, हिंद कॉपर,हिंदाल्को आणि इतर कॉपर कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली. ज्यांनी या शेअरमध्ये अगोदरच गुंतवणूक केलेली आहे. त्यांना भविष्यात कमाईची मोठी संधी असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मतं आहे. आगामी काळात सोने आणि चांदी प्रमाणे हा धातू सुद्धा कमाल दाखवण्याची शक्यता आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.