
भारतीय रेल्वे... देशातलं सर्वात सुखकर, सोयी सुविधांयुक्त असं प्रवासाचं साधन... शिवाय रेल्वेचं तिकीट सामन्यांना परवडतं देखील... त्यामुळे रेल्वेने प्रवास करणं खिशाला परवडणारं आहे.

भारतीय रेल्वेचं जाळं देशभरात पसरलेलं आहे. उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम असं हे रेल्वे जाळं... भारतातील विविध राज्यांना जोडतं. यामुळे ग्रामीण भाग शहरी भागाशी जोडला जातो.

सध्या वंदे भारत या ट्रेनलाही लोक पसंती देतात. या मोदी सरकारच्या काळात आलेल्या या ट्रेनमुळे वेगवान प्रवास होतो. मात्र त्याचं तिकीट जास्त असल्याने सर्वसामान्य लोक मात्र जुन्या रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात.

भारतीय रेल्वे देशभर सेवा देते आहे. याचं नेटवर्क प्रचंड मोठं आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की भारतात रेल्वेचे डबे किती आहेत? त्यांची संख्या किती आहे?

एका रिपोर्ट नुसार भारतात ट्रेनचे एकूण 68 हजार 534 डब्बे आहेत. यात 44 हजार 946 स्लीपर आणि जनरल डब्बे आहेत. यातूनच भारतीय नागरिक प्रवास करत असतात.