
आयपीएलच्या 17 व्या मोसामाला सुरूवात होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. सर्व क्रिकेट चाहते 22 मार्च या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिला सामना सीएसके आणि आरसीबी या दोन संघांमध्ये होणार आहे.

पहिला सामना मोठ्या संघांमध्ये असला तरी त्यानंतर दोन दिवसांनी 24 मार्चला मुंबईच्या चाहत्यांसाठी खरी आयपीएल सुरू होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघामध्ये महामुकाबला होणार आहे.

आयपीएलआधी सर्वांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे मुंबईची तोफ असलेला स्टार खेळाडू फिट झाल्याचं दिसत आहे. हा खेळाडू नेटमध्ये सराव करताना दिसला.

मुंबईची ताकद असलेला स्टार खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सूर्यकुमार यादव आहे. सुर्यावर सर्जरी झाली होती त्यामुळे तो क्रिकेट मैदानापासून दूर होता. आता तो सरावासाठी मैदानात उतरला. सुर्याने इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे.

सुर्यकुमार यादव पूर्ण फिट व्हावा अशी आशा त्याचे चाहते करत आहेत. त्यामुळे येत्या आयपीएल मोसमात हार्दिक पंडया कर्णधार असल्याने त्याला दिलासा देणारी बातमी आहे.