
'तुला शिकवीन चांगलात धडा' ही मालिका तुम्ही पाहिलीत का? ही मालिका तुम्ही पाहता का? या मालिकेत भुवनेश्वरी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबाबत तुम्हाला माहिती आहे का?

अभिनेत्री कविता लाड 'तुला शिकवीन चांगलात धडा' मालिकेत भुवनेश्वरी ही भूमिका साकारते. मालिकेत खाष्ट सासूची भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.

मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री कविता लाड ही खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड प्रेमळ आहे. लाईट ग्रिन कलरच्या साडीतील कविता लाडचा हा लूक....

उंच माझा झोका, राधा ही बावरी, राधा प्रेम रंगी रंगली या मालिकांमध्ये कविताने काम केलं आहे. एका लग्नाची पुढची गोष्ट हे तिचं नाटकही सध्या सुरु आहे. तर सध्या 'तुला शिकवीन चांगलात धडा' मालिकेत भुवनेश्वरी ही भूमिका कविता करते आहे.

असेही एकदा व्हावे, गर्लफ्रेंड, लव्ह यू जिंदगी, सुखांत, उर्फी यासह आणखी काही सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. तिच्या अभिनयलाने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.