Mumbaicha Raja Ganesh Galli: ‘मुंबईचा राजा’ गणेशगल्लीच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक

मुंबईचा राजा गणेशगल्लीचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांची प्रचंड गर्दी पहायला मिळतेय. लालबाग-परळ हा परिसर 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा जयघोषांनी दुमदुमला आहे.

| Updated on: Sep 17, 2024 | 12:38 PM
1 / 8
दहा दिवसांच्या पूजा आणि सेवेनंतर आता अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे.

दहा दिवसांच्या पूजा आणि सेवेनंतर आता अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे.

2 / 8

घराघरात आणि सार्वजनिक मंडळात विराजमान झालेले गणराय आता भक्तांचा निरोप घेत आहेत.

3 / 8

लालबाग परळ परिसरात विविध गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघत आहेत.

4 / 8

मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक जल्लोषात निघाली आहे.

5 / 8

यंदा गणेशगल्लीच्या गणपतीला उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती.

6 / 8

विसर्जनाच्या मिरवणुकीने लालबाग-परळ परिसर गजबजून गेला आहे.

7 / 8

मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या गणपतीची मूर्ती मंडपातून बाहेर आली आहे. विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.

8 / 8

मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयघोष भक्तांकडून करण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us