गाण्यासाठी 4 मिनिट थंड धबधब्याखाली भिजली, कठीण परिस्थितीत केलं शूटिंग, गाणं ठरला सुपरहिट

60 वर्षांपूर्वीच 4 मिनिटांचं गाणं, ज्यामध्ये 4 मिनिट थंड धबधब्याखाली अभिनेत्री राहिलेले भीजत, पडली होती आजारी, आजही ते गाणं प्रचंड हिट. ऐकताच मनाला मिळतो सुकून.

| Updated on: May 05, 2026 | 1:33 PM
1 / 5
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींचा उल्लेख झाला की मुमताज यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आपल्या दमदार अभिनय आणि आकर्षक पडद्यावरील उपस्थितीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली. त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट आणि गाणी आली, पण एका गाण्याच्या शूटिंगशी संबंधित एक खास किस्सा आजही चर्चेत आहे.

2 / 5
सुमारे 60 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'सावन की घटा' या चित्रपटातील 'आज कोई प्यार से...' हे गाणे विशेष प्रसिद्ध झाले. या गाण्यात मुमताज यांच्यासोबत मनोज कुमार झळकले होते तर शर्मिला टागोर यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली होती.

3 / 5
या गाण्याचे चित्रीकरण एका धबधब्याखाली करण्यात आले होते. जवळपास 3 मिनिटे 57 सेकंद चालणाऱ्या या गाण्याच्या शूटिंगदरम्यान मुमताज यांना सतत थंड पाण्यात भिजत उभे राहावे लागले. त्यामुळे त्या खूप थंडीने कुडकुडत होत्या आणि त्यांची तब्येतही बिघडली होती. आजही या गाण्याचा व्हिडिओ पाहताना त्या कठीण परिस्थितीची कल्पना येते.

4 / 5
'आज कोई प्यार से...' हे गाणे त्या काळातील लोकप्रिय गायिका आशा भोसले यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले आहे.  या गाण्याचे बोल, संगीत आणि चित्रिकरण यामुळे ते त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले आणि आजही जुन्या गाण्यांच्या चाहत्यांमध्ये ते आवडीने ऐकले जाते.

5 / 5
मुमताज यांचे हे गाणे केवळ त्याच्या सुरेलतेमुळेच नाही तर त्यामागील मेहनत आणि समर्पणामुळेही विशेष ठरते. कठीण परिस्थितीतही त्यांनी दिलेली परफॉर्मन्स ही त्यांच्या व्यावसायिकतेचे उत्तम उदाहरण मानली जाते.

Follow Us