
आपण जे खातो ज्याचा सरळ सरळ परिणाम आपल्या स्किनवर होतो. खाणं योग्य नसेल तर वेळेआधीच आपण म्हातारे दिसू लागतो. त्वचा तरुण आणि तजेलदार ठेवण्यासाठी पोषक तत्त्वांचा आहारात समावेश करावा.

त्वचेसाठी महागडी उत्पादने उत्तम असतात हा एक गैरसमज मुलींमध्ये दिसून येतो. त्वचेची उत्पादने त्वचेवर किती परिणामकारक असतात हे त्या उत्पादनाच्या घटकांवर अवलंबून असतं, त्या उत्पादनाच्या किंमतीवर नाही.

त्वचा खराब करणाऱ्या पदार्थांमध्ये सगळ्यात पहिला प्रकार आहे तळलेले पदार्थ! तळलेला कोणताही पदार्थ जर तुम्ही खाल तर त्वचेची अवस्था वाईट होते. त्वचा तरुण आणि चांगली ठेवायची असेल तर आजच तळलेले पदार्थ आहारातून काढून टाका.

बऱ्याच लोकांना असं वाटतं की ज्या नॅचरल, ऑर्गेनिक गोष्टी आहेत त्याने त्वचेचं कुठलंच नुकसान होत नाही. पण हा खूप मोठा गैरसमज आहे. कोणतेही उत्पादन खरेदी करताना त्यात काय-काय घटक आहेत ते आधी वाचावं. कोणत्या त्वचेच्या प्रकाराला काय चांगलं सूट होतं ते बघूनच एखादी ऑर्गेनिक गोष्ट त्वचेला लावावी नाहीतर नुकसान होऊ शकतं.

सनस्क्रीनला घेऊन मुलींचे अनेक अनेक गैरसमज आहेत. सनस्क्रीन म्हटलं की आपण ते उन्हात असताना लावतो, जेव्हा सूर्यप्रकाश खूप असतो तेव्हाच लावतो. सनस्क्रीन थंडीत लावलं जात नाही असे काही गैरसमज असतात. खरं तर थंडी असो किंवा ऊन असो सनस्क्रीन लावलंच पाहिजे. या लोशनचा रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये समावेश करावा.