PHOTO : शाळांना सुट्टी, नागपुरात साकारला रायगड किल्ला; दोन भावांची आयडियाची ‘भन्नाट’ कल्पना
नागपुरातील मंदार आणि अर्णव उट्टलवार या भावंडांनी शिवकालीन `रायगड' किल्ल्याची सुंदर प्रतिकृती साकारली आहे. (Nagpur Two Brother Create Raigad fort Replica)
-
-
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहे. पण हा वेळ सत्कारणी लावत नागपुरातील मंदार आणि अर्णव उट्टलवार या भावंडांनी शिवकालीन `रायगड’ किल्ल्याची सुंदर प्रतिकृती साकारली आहे.
-
-
या दोन्ही भावांनी मिळून दिवाळीनिमित्त तब्बल 10 बाय 10 फूट लांबीचा रायगड किल्ला साकारला आहे.
-
-
या 10 बाय 10 फूट लांबीच्या किल्ल्यासाठी 1 ट्रॅक्टर माती, दगड आणि शाडू मातीचा वापर करण्यात आला.
-
-
रायगड किल्ल्याच्या या प्रतिकृती साकारण्यासाठी 15 दिवसांचे परिश्रम घेतले आहे. त्यांनी साकारलेली ही प्रतिकृती बघण्यासाठी नागपूरकर गर्दी करीत आहेत.
-
-
शिवरायांचा गौरवशाली इतिहास, दूरदृष्टीची कल्पना नव्या पिढीला यावी, गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावे, यासोबतच लहान मुलांमध्ये मातीतून कला साकारण्याचे कसब अंगी यावे, हा उद्देश रायगड किल्ला साकरण्यामागे असल्याचे मंदार आणि अर्णव उट्टलवार या भावंडांनी सांगितलं आहे.