माझ्याकडे मुख्यमंत्रिपद नाही, पण मी शब्द देतो की…; उद्धव ठाकरेचं आंदोलकांना काय आश्वासन?

| Updated on: Dec 12, 2023 | 1:31 PM

Uddhav Thackeray on Old Pension : माझ्याकडे मुख्यमंत्रिपद नाही, पण मी शब्द देतो की...; उद्धव ठाकरेचं आंदोलकांना काय आश्वासन? जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलंय? जुन्या पेन्शन योजनेसाठी सध्या नागपुरात आंदोलन होतंय.

1 / 5
जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला आहे. या आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी झाले.

2 / 5
नागपुरात होत असलेल्या या आंदोलनाच्या ठिकाणी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं.

3 / 5
दीड महिन्यापूर्वी तुमचे नेते मला भेटले. त्यांनी बोलावल्यानंतर मी आलो. पण आज जर मी मुख्यमंत्री असतो तर तुम्हाला हा मोर्चा काढावाच लागला नसता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

4 / 5
सरकार घोषणा करतं. पण कागदावरच्या योजना जमीनीवर आणण्याचं काम प्रशासन करत असतं. पण या महत्वाच्या घटकालाच आपल्या न्याय हक्कांसाठी आक्रोश करावा लागत असेल, तर सरकारला टेन्शन देण्याची गरज आहे, असं ठाकरे म्हणाले.

5 / 5
माझा पक्ष चोरला, निवडणूक चिन्ह चोरलंय... मी आता मुख्यमंत्री नाही. माझ्याकडे काही नाही. तरीही तुम्हाला ताकद द्यायला मी आलोय. मी शब्द देतो, शिवसेना तुमच्या आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत असेल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.