Tanushree Dutta : ‘नव्या अभिनेत्रींना वेश्याव्यवसायात…’, इंडस्ट्रीचं काळं सत्य, तनुश्रीच्या वक्तव्याने उडली सर्वत्र खळबळ
Tanushree Dutta : अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर धक्कादायक दावे करणारी तनुश्री सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे. यामुळे तिने जुने केलेले दावे देखील आता समोर येत असून खळबळ उडाली आहे. एका मुलाखतीत तनुश्री हिने इंडस्ट्रीचं काळं सत्य समोर आणलं होतं. नव्या कलाकारांबद्दल अभिनेत्री मोठा दावा केलेला

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अनेक धक्कादायक दावे केले आहे. जेथे नानांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे, तेथे तनुश्री हिने नाना जिंवत असून परदेशात असल्याचा दावा केला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ही पहिली वेळ नाही जेव्हा तनुश्री हिने धक्कादायक दावा केला आहे. याआधी देखील अभिनेत्रीने इंडस्ट्रीचं काळं सत्य समोर आणलं होतं. अभिनय विश्वात पदार्पण केल्यानंतर अनेक नव्या कालाकारांनी इंडस्ट्री सोडली तर, अनेकांना वेश्याव्यवसायात पाठवलं.. असं वक्तव्य अभिनेत्रीने केलं.
अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी इंडस्ट्रीतील काळं सत्य उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. रिपोर्टनुसार, एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री हिने म्हटलं आहे की, काही नव्या कालाकारांनी आधी त्यांच्या कौतुकाचं आमिष दाखवलं जाते आणि नंतर कठीण परिस्थितीत त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं.
तनुश्री म्हणालेली, 'काही लोक वेश्याव्यवसायात जातात कारण त्यांच्यावर एवढा अन्याय किंवा गैरव्यवहार झालेला असतो की लोक त्यांना या धंद्यात ढकलून देतात. काही लोक इतके उद्ध्वस्त होतात की ते आपले शहर सोडून परत निघून जातात.'
अभिनेत्री म्हणाली की, या कहाण्या क्वचितच सर्वांच्या समोर येतात कारण इंडस्ट्री केवळ यशाच्याच गोष्टी जगासमोर आणते. अशा गोष्टींवर पडदा टाकला जातो... असं देखील तनुश्री म्हणाली होती.. सध्या सर्वत्र तनुश्री दत्ता हिची चर्चा सुरु आहे.