
नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शिवा घोडेकर या शेतकर्याने पाच वर्षांपूर्वी ऑनलाईन पद्धतीने 1700 रुपयाचे 500 ग्राम हळदीचे बेणे मागवले आणि त्याची लागवड केली होती.

तेच हळदीचे बेन पुन्हा - पुन्हा लावून घोडेकर यांनी हळदीचे अडीच ते तीन क्विंटल उत्पादन काढले आहे. आता या हळदीचा बाजारभाव तीन लाख रुपये एवढा आहे.

या हळदीला शेणखत, गांडूळ खत, निंबोळी अर्क, गोमूत्र फवारणी करत जोपासना केली

आता त्यांच्याकडून ही हळद डॉक्टर परिसरातील शेतकरी, आयुर्वेदिक मेडिकल चालक 1000 रुपये किलोने ही हळद खरेदी करत आहेत.

आयुर्वेदात औषधासाठी काळ्या हळदीला महत्त्व आहे रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यासाठी ही हळद गुणकारी असल्याचे शिवा घोडेकर यांचे म्हणणे आहे.

ही हळद विकण्यासाठी त्यांनी कोणत्याही कंपनीशी करार केलेला नाही मात्र अनेक लोक ही हळद खरेदी करत असल्याचे हळद उत्पादक शेतकरी शिवा घोडेकर यांनी सांगितलं.