
नांदेडमध्ये लाठ खुर्द येथील रामचंद्र गोरकटे या शेतकऱ्यांने हळदीचे विक्रमी उत्पादन घेतलंय. जुन्या "नांगरी" पद्धतीने हळदीची लागवड केल्याने शेतकऱ्याला एकरी वीस क्विंटल हळदीचे उत्पादन झालय.

हळद लागवडीची ही पद्धत जुन्या काळातील असून ती लाभदायी असल्याचे रामचंद्र गोरकटे या शेतकऱ्यांने सांगितलय.

तीन एकर शेतीमध्ये हळद लावली होती. त्यातून आम्हाला एकरी वीस क्विंटल प्रमाणं उत्पादन झाल्यांचं रामचंद्र गोरकटे यांनी सांगितलं.

हळद पिकाचे झालेले हे विक्रमी उत्पादन पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला असून अनेक जण या शेतकऱ्यां कडून नांगरी पद्धत जाणून घेतायत. हळदीच्या झालेल्या या विक्रमी उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येतंय.

रामचंद्र गोरकटे यांनी हळद लागवड करण्यासाठी पारंपारिक शेतीमधील नांगरी पद्धतीचा वापर केला. हळद काढण्यासाठी त्यांना घरच्यांची मदत भेटली आहे.

नांदेडमध्ये यंदा उन्हाळी मुगाचे पीक जोरदारपणे बहरलंय. गतवर्षी अतिवृष्टीमुळे मुगाचे पीक हातातून गेल्याने शेतकऱ्यांना घरी खायला देखील मूग प्राप्त झाला नाही.

अतिवृष्टी आणि पावसाचा फटका बसू नये म्हणून बहुसंख्य शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी मुगाची पेरणी केली. उन्हाळ्यात पोषक हवामान राहिल्याने मूग पिकाला चांगला बहार लागलाय. त्यामुळे उन्हाळी मुग यंदा लाभदायी ठरल्याने बळीराजा सुखावलाय.

गेल्यावर्षी मूग पिकाला पावसाचा फटका बसल्यानं यदा उन्हाळी मूग पेरल्याचं गजानन या तरुण शेतकऱ्यानं सांगितलं आहे.