Mata Vaishno Devi | वैष्णो देवी मंदिर परिसर चेंगराचेंगरी, मृतांच्या नातेवाईकांना जम्मू-काश्मीर सरकार 10, तर केंद्राकडून 2 लाखांची मदत

| Updated on: Jan 01, 2022 | 7:57 AM

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं सांगितलंय.

1 / 5
जम्मू : जम्मूमधील कटरा येथे माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल बारा जाणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 14 भाविक जखमी झाल्याची माहिती मिळतेय.

2 / 5
जखमी तसेच मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे येथे युद्धपातळीवर बचावकार्य केले जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच जम्मू काश्मीर सरकारने या चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांना मोठी मदत जाहीर केली आहे.

3 / 5
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल  मनोज सिन्हा यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं सांगितलंय.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं सांगितलंय.

4 / 5
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून जखमी भाविकांना 50 हजार रुपये मदत म्हणून दिले जातील. तर जम्मू-काश्मीर सरकारतर्फे जखमी लोकांना दोन लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

5 / 5
दरम्यान, ही चेंगराचेंगरी नेमकी का झाली याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या सर्व घटनेकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेऊन असून त्यांनी तत्काळ मदतकार्य करण्याचे आदेश दिलेले आहेत