
एलटीटी जयनगर पवन एक्स्प्रेचे चार डबे रुळावरून घसल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

या भीषण अपघातात एकाच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत.

यामुळे अनेक गाड्याही रद्द कराव्या लागल्या आहेत. या अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत.

या अपघाताची भीषणता एवढी होती की रुळाच्या खाली असणाऱ्या तारा बाहेर आल्याचे या फोटोमधून दिसून येत आहे.

या मार्गावर अपघात झाल्याने अनेक गाड्या इतर मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. या अपघातामुळे मनमाड पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेसही या अपघातामुळे रद्द करण्यात आली आहे. तसेच अदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेसही रदद करण्यात आली आहे.