Girija Oak Godbole : तुझ्यासारखी 5% जरी झाले ना… गिरीजा ओकची आईसाठी खास पोस्ट, स्पेशल फोटोही शेअर!

नॅशनल क्रश बनलेली गिरीजा ओक-गोडबोले सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. चाहत्यांसोबत ती विविध अपडेट्सही शेअर करते. आज आईच्या वाढदिवसानिमित्त गिरीजाने खास मेसेज लिहीत काही फोटोजही पोस्ट केलेत.

| Updated on: Dec 29, 2025 | 5:04 PM
1 / 6
गेल्या महिन्या-दोन महिन्यांपासून संपूर्ण इंटरनेटवर धूमाकूळ घालणाऱ्या निळ्या साडीतल्या गिरीजा ओकचे फोटो पाहिले नसतील असा माणूस विरळाच ! नॅशनल क्रश ठरलेल्या गिरीजीचं हसणं, दिसणं, बोलणं याचे अनेक चाहते असून महिन्याभरात तर त्यात प्रचंड वाढ झाली आहे. गिरीजाबद्दल जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्यास चाहतेही उत्सुक आहेत. ती सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते. अनेक फोटो, व्हिडीओ टाकत ती तिच्या आयुष्यातल्या, कामाबद्दलच्या अपडेटसही चाहत्यांसोबत शेअर करते. (Photos : Instagram)

2 / 6
आता गिरीजाने आणखी एक खास पोस्ट केली आहे ती तिच्या आईसाठी. गिरीजाची आई पद्मश्री यांचा आज वाढदिवस असतो, त्या निमित्ताने गिरीजाने तिच्यासाठी खास मेसेज लिहीला असून त्यासोबतच आईसह काढलेले काही गोड फोटोही पोस्ट केले आहेत. त्यात एक फोटो तर चक्क तिच्या लहानपणीचा आहे.

3 / 6
“जर मी 5 टक्केसुद्धा माझ्या आईसारखी, स्त्री आणि आई बनू शकले ना, तर माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असेल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई, तू बेस्ट आहेस" अशा शब्दांत गिरीजाने आईचं कौतुक करत तिला वाढदिवसाच्या  शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 6
यासोबतच तिने तिच्या आईसह काढलेले वेगवेगळे गोड फोटोही कले आहेत. त्यापैकी शेवटच्या फोटोनो तर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. कारण त्यामध्ये  अगदी लहान असलेली गोबऱ्या गालांची गिरीजा आणि तिची आई दिसत आहेत. या फोटोत ती खूपच गोंडस दिसत्ये.

5 / 6
गिरिजा मुलाखतींमधूनही अनेकदा तिच्या आईबद्दल बोलते. तिच्या बालपणीच्या आईबरोबरच्या आठवणीही तिने अनेकदा सांगितल्या आहेत. आजच्या खास पोस्टमधूनही आई-लेकीचं प्रेमळ , गोडं नातं अगदी स्पष्टपणे दिसतंय.

6 / 6
तिच्या या पोस्टवर आणि फोटोंवर भरभरून लाईक्स आले असून अनेकांनी कमेंट्स करत गिरीजाच्या आईला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.