
energetic drinks

ग्रीन टी आरोग्यासाठी, त्वचेसाठी खूप चांगली असते. ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरासाठी चांगले असतात. नवरात्रीच्या उपवासात तुम्ही दिवसाची सुरुवात ग्रीन टीने करू शकतात. ग्रीन टी ने एकदम हलके वाटते.

आल्याचा चहा: आल्याचा चहा प्यायल्याने डोकं शांत राहतं. थंडीपासून संरक्षण होतं, घशात खवखव होत असेल तर ती बंद होते. चहाने शरीराला ऊर्जा मिळते ही ऊर्जा उपवासात खूप गरजेची असते. ९ दिवसाचा उपवास तर नक्कीच ऊर्जेची गरज भासते. आल्याचा चहा प्या, बरं वाटेल.

दालचिनी चहा तुम्हाला आवडतो का? दालचिनी चहा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतो. नवरात्रीचा ९ दिवसांचा उपवास असताना तुम्ही रोज तुमच्या दिवसाची सुरुवात दालचिनी चहाने करू शकता.

लव्हेंडर चहामध्ये लॅव्हेंडर इसेन्स असतो. उपवासात सुद्धा तुम्ही लॅव्हेंडर चहाचे सेवन करू शकता. हा चहा प्यायल्याने थकवा दूर होतो. बरीच लोकं या चहाचे सेवन सकाळी करतात.