Navratri Fashion | दांडिया नाईटच्या लूकमध्ये आवर्जून घाला हे पाच प्रकारचे दागिने!

दांडिया, गरब्याचा उत्सव आलाय. स्त्रियांना नटून-थटून दांडिया मध्ये सहभागी व्हायला फार आवडतं. भारतीयांचे उत्सव जल्लोषातच असतात असं म्हणायला हरकत नाही. दांडिया खेळताना छान आवरून, घागरा घालून, नाचायला जी मजा येते ती मजा आणखी कशातच नाही. हा उत्सव साजरा करताना कसा लूक करावा. काय घालावं, कोणते दागिने घालावेत? जाणून घेऊयात याविषयी...

| Updated on: Oct 10, 2023 | 10:26 PM
1 / 5
दांडिया नाईटसाठी चांगला लूक करायचा असेल छान दिसायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे घागऱ्याची निवड. घागरा किंवा लेहंगा निवडताना तो जास्त जड नसावा कारण तुम्हाला दांडिया खेळायच्या असतील, मस्त नाचायचं असेल तर घागरा जड असताना तुम्ही हे करू शकत नाही. तुम्ही फ्रॉक सारखी कुर्ती किंवा शरारा कुर्तीची निवड करू शकता.

2 / 5
छान असा घागरा घालून तुम्ही केसांची वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकता. केस बांधून तुम्ही गजरा लावू शकता किंवा आर्टिफिशियल दागिने केसात घालू शकता. एलिगंट लूक असेल तर तुम्ही अजून छान दिसाल.

3 / 5
दांडिया नाईटसाठी नटताना तुम्ही राजस्थानी किंवा गुजराती लूक करू शकता. काळ्या रंगाचे दागिने, हे दागिने पारंपारिक असायला हवेत. ब्लॅक मेटलचे दागिने, मांग टीका हे दागिने घाला. आरसे असणारी ओढणी घेऊ शकता ज्याने राजस्थानी लूक येईल.

4 / 5
दांडिया आणि गरबा खेळताना सगळ्यात जास्त जर काही उठून दिसत असेल तर ते आहेत दागिने. दांडिया खेळताना कमरपट्टा खूप उठून दिसतो. कमरपट्ट्याशिवाय लूक अपूर्ण आहे. हा दागिना निवडताना तुमच्या घागऱ्याला शोभून दिसेल असा घ्या.

5 / 5
मांग टिका हा स्त्रियांचा सगळ्यात आवडता दागिना आहे. हा दागिना स्त्रियांना पारंपारिक लूक देतो. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी तुमचा लूक अजून सुंदर बनवते. यात अनेक प्रकार असतात. फ्लोरल ज्वेलरी असते, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी असते, सोनेरी रंगाची असते. दांडिया, गरबा खेळताना हे दागिने अजून उठून दिसतात, स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालतात.