Navratri 2026 : हाताने चुरगळता येईल इतका मऊ! ‘या’ दोन पदार्थांनी बनवा नवरात्री स्पेशल उपवासाचा पराठा
हातात चुरगळता येईल इतका मऊ आणि चवीला एकदम भारी असा उपवासाचा आलू पराठा तुम्ही कधी ट्राय केला आहे का? आज आपण नवरात्री स्पेशल असा उपवासाचा आलू पराठा कसा बनवतात हे पाहणार आहोत त्यासाठी खालील माहिती वाचून हि रेसिपी नक्की ट्राय करा.

साहित्य: एक वाटी साबुदाणे, अर्दी वाटी वरई, एक उकडलेला बटाटा, मिरची पेस्ट, दही, मीठ, शेंगदाणे कूट, तेल किंवा तूप, पाणी इत्यादी.
सर्वप्रथम साबुदाणे आणि वरई हे एकत्र भाजून घ्या. त्यानंतर ते मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तयार झालेलं पीठ हे चाळणीने चालून घ्या. त्या पिठात उकडलेला बटाटा, मिरची पेस्ट, शेंगदाणे कूट, दही आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिश्रण एकत्र पाणी टाकून मळून घ्या.
नंतर गोळे करून पराठा सारखा गोल लाटून घ्या, आकार एकसारखा येण्यासाठी गोल भांड्याने ते गोलाकार करून घ्या.
नंतर गॅसवर पॅन ठेऊन तेल किंवा तूप पॅन वर घाला आणि पॅन गरम झाल्यावर मध्यम आचेवर तेल/ तूप लावून पराठा छान असा भाजून घ्या. गरम गरम उपवासाचा आलू पराठा दही किंवा चटणी सोबत सर्व्ह करा. एकदम टेस्टी असा उपवासाचा आलू पराठा बनवायला सुद्धा अगदी सोपा आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा.