‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील ट्विस्ट पाहून नेटकरी म्हणाले ‘बेस्ट सरप्राइज..’

लीला आणि एजेचे हे गोड क्षण, दुर्गाचा कट कसा हाणून पाडणार लीला आणि एजे, हे सर्व प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळणार आहे. 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Jan 28, 2025 | 12:40 PM
1 / 5
झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत रेवतीच्या लग्नाची लगबग सुरू आहे. लीलाला जाणवतंय की एजे तिच्या प्रेमात आहे.

2 / 5
रेवती आणि यशच्या हळद, मेहंदी, संगीत आणि इतर लग्नाच्या  विधींमध्ये एजेची नजर लीलावरून हटतच नाहीये. हे पाहून लीलाला खात्री पटते की एजेचं तिच्यावर प्रेम आहे.

3 / 5
खात्री पटल्यावर ती एजेसमोर एक अट ठेवते की त्याला स्वतःच्या प्रेमाची जाहीर कबुली द्यावी लागेल आणि ती कबुली लीलाला एजेकडून ऐकायची आहे.

4 / 5
दरम्यान, दुर्गा विक्रांतला सांगते की शेवटच्या क्षणी यशची जागा घेऊन त्याने रेवतीशी लग्न करावं. या सर्वात लीला, एजेला गिटार आणून  देते जी तो अंतरासाठी वाजवायचा.

5 / 5
एजे पुन्हा एकदा गिटार वाजवायची इच्छा दर्शवतो. अंतराच्या निधनानंतर अभिराम पहिल्यांदाच गिटार वाजवणार आहे आणि ते ही लीलासाठी.